आर्थिक आणीबाणी - मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आर्थिक आणीबाणी - मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त

Share This
मुंबई - भारतीय चलनातून 500 आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सध्या बँकांबाहेर नोटा बदलण्यासाठी नागरिकांची उडालेला गोंधळ पाहता ही स्थिती लवकरात लवकर न निवळल्यास देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. याच पार्श्वभूमीवर राज्यात हायऍलर्ट घोषित करण्याचे संकेत केंद्रीय गुप्तचर तसेच तपास यंत्रणांनी दिले आहेत. मात्र, अशा प्रकारचा हायऍलर्ट अद्याप मिळाला नसली तरी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच बनावट नोटांना आळा घालण्यासाठी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नागरिकांकडे पैसे असूनही ते वापरता येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर, तसेच एटीएम सेंटर बाहेरही नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यातच रांगेत उभे राहिल्याने हृदयविकाराच्या झटक्याने देशभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना, भलेही या निर्णयाचे सामान्य नागरिक स्वागत करत असले तरी आर्थिक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे केंद्र सरकारने ही परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. केंद्रीय गुप्तचर तसेच तपास यंत्रणांनीही ही शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये हायऍलर्ट घोषित करण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages