23 नोव्हेंबरला केमिस्टचा देशव्यापी संप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

23 नोव्हेंबरला केमिस्टचा देशव्यापी संप

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - ऑनलाईन औषधविक्रीविरोधात आँल इंडिया आँर्गनायझेशन आँफ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने येत्या 23 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात देशभरातील 8 लाख केमिस्ट सहभागी होणार आहेत. संपात मुंबईतील सुमारे 10 हजार केमिस्टचा समावेश असेल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

ऑनलाईन औषधविक्रीवर बंदी असतानाही राजरोसपणे ऑनलाईन औषधविक्री सुरू असून ऑनलाईन औषधविक्री कंपन्यांकडून जाहिरातीही जोरात सुरू आहेत. असे असताना केंद्र सरकार-राज्य सरकार मुग गिळून गप्प आहे. आँनलाईन औषधविक्रीविरोधात धोरण ठरवण्याचे केंद्राने जाहिर केले पण अद्याप हे धोरण प्रत्यक्षात आलेले नाही. त्यामुळे असोसिएशनने ऑनलाईन औषधविक्रीसह अवैध औषध विक्रीवर नियंत्रण आणावे या मागणीसाठी हा सपं पुकारल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages