मुंबई दि 4 -- रिपब्लिकन पक्षातर्फे आगामी महापालिका निवडणुकीत ईशान्य मुंबई जिह्यातून 25 जागा ताकदिने लढविणयाची तयारी पूर्ण झाली असुन येत्या 26 नोव्हेम्बर रोजी रिपाइंच्या वतीने घाटकोपर मध्ये संविधान सन्मान महासम्मेलन आयोजित करण्यात येणार आहे याच सम्मेलनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत अशी माहिती रिपाइंचे ईशान्य मुम्बई जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गरुड़ यांनी दिली आहे
माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रिपाइं कार्यालयात सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हाकार्यकारिणीची बैठक आज झाली त्यात 26 नोव्हेम्बरचा जिल्हा मेळावा यशस्वी करण्याबाबत आणि जिल्ह्यातून 25 वॉर्डमध्ये रिपाइं तर्फे निवडणूक लढन्याची तय्यारी करण्याचा निर्णय झाला असल्याचे बाळासाहेब गरुड़ यांनी कळविले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक ताकदिने लढन्याची जोरदार तय्यारी करण्यात येत आहे ईशान्य मुंबई जिल्ह्यातून अनेक ईच्छुक उमेदवार आपापल्या मतदारसंघात कार्यरत झाले आहेत तालुकानिहाय बैठका आयोजित करण्यात येत असल्याचे गरुड़ यांनी कळविले आहे