वनविभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सुधारित दराने गणवेश भत्‍ता मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2016

वनविभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सुधारित दराने गणवेश भत्‍ता मंजूर

मुंबई / प्रतिनिधी
वनविभागातील वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वनक्षेत्र सर्व्‍हेक्षक आणि सर्व्‍हेक्षक या संवर्गातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना गणवेश व त्‍यासोबतच्‍या 25 बाबींसाठी वार्षीक रूपये 5167 दराने सुधारित भत्‍ता मंजूर करण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. राज्‍य शासनाच्‍या महसुल व वनिभागाने दिनांक 3 नोव्‍हेंबर 2016 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.


वन विभागातील कर्मचारी व अधिका-यांचा उत्‍तम गणवेश हा त्‍यांची कर्तव्‍ये आणि जबाबदा-या कार्यक्षमतेने आणि परिणामकारकरीत्‍या पार पाडण्‍यास बळ देणारा आहे. वन, वन्‍यजीव, जैवविविधता, पर्यावरण, निसर्ग यांचे संरक्षण आणि संवर्धन विषयक कामे प्रभावीपणे पार पाडताना अधिकारी तसेच कर्मचा-यांचा उत्‍कृष्‍ट गणवेश समाजामध्‍ये मानाचे आणि आदराचे स्‍थान निर्माण करण्‍यास उपयुक्‍त ठरतो.
वन विभागांतर्गत कर्मचारी तसेच अधिकारी यांना पुरविण्‍यात येणा-या गणवेशाच्‍या किंमतीमध्‍ये व त्‍यासोबत पुरविण्‍यात येत असलेल्‍या बाबींच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. वन विभागातील क्षेत्रीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना बदलत्‍या काळानुसार वापाराकरीता सोयीस्‍कर, निसर्गाशी व समारंभाशी गणवेश भत्‍ता मंजूर करण्‍याची बाब शासनाच्‍या विचाराधिन होती. त्‍यास अनुसरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर निर्णय घेतला आहे.

गणवेशासोबतच्‍या 25 बाबींमध्‍ये खाकी पँन्‍ट, खाकी शर्ट, खाकी साडी, खाकी ब्‍लॉऊज, खाकी पेटीकोट, खाकी वुलन जर्सी, बॅरेट कॅप, लेदर अँकल शुज, शुज लाल, खाकी सॉक्‍स, वुलन सॉक्‍स, व्हिसल कॉर्ड, व्हिसल, नेम प्‍लेट, रेनकोर्ट (शट्र व पॅन्‍ट) बक्‍कल प्‍लेट बेल्‍ट, शोल्‍डर बॅज, ऑर्म बॅज, लाठी, हॅवर सॅक, वॉटर बॉटल, सिंगनेट बनियान, खाकी शॉर्टस्, खाकी वुलन जॅकेट, कॅप बटन या साहित्‍यांचा समावेश आहे. वनविभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सुधारित दराने गणवेश भत्‍ता मंजूर करण्‍याची प्रलंबित मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पूर्ण झाल्‍यामुळे अधिकारी व कर्मचा-यांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post Bottom Ad