राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 5 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 5 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार

मुंबई, दि. 15 Nov 2016 :
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2016 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून चार नवीन आणि 11 प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.

विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली. यावेळी विधानसभेतील बैठकीस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संसदीय कार्य मंत्री विजय शिवतारे, विधानसभेतील आमदार अजित पवार, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, राज पुरोहित, सुनिल प्रभू यांच्यासह विधान परिषदेच्या बैठकीस उपसभापती माणिकराव ठाकरे, परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार नारायण राणे, निलम गोऱ्हे, जयंत पाटील, हेमंत टकले, शरद रणपिसे, सतीश चव्हाण, संजय दत्त यांच्यासह वित्त विभागाचे प्रधान सचिव डी.के. जैन, संसदीय कार्य विभागाचे प्रधान सचिव पी. एच. माळी, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यु.के. चव्हाण आदी उपस्थित होते.

या बैठकीत विधीमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात आले. पाच डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके, शासकीय कामकाजावर चर्चा होणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी आज दिली.

हिवाळी अधिवेशनात मांडली जाणारी व प्रलंबित विधयेकांची यादी
विधान सभेत प्रलंबित विधेयके –
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (चौथी सुधारणा) विधेयक 2015 व महाराष्ट्र स्थानिक सदस्य प्राधिकरण अनर्हता (सुधारणा) विधेयक 2016

विधान परिषदेत प्रलंबित विधेयके -
1) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक 2016, 2) महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक 2016. 3) महाराष्ट्र महानगर पालिका (सुधारणा) विधेयक, 2016. 4) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2016. 5) महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक 2016. 6) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक 2016.

प्रस्तावित नवीन विधेयके - 1) डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठ विधेयक 2016. 2) महाराष्ट्र खनिज विकास निधी (निर्मिती व उपाय योजन) (निरसन) विधेयक 2016. 3) मुंबई महानगर पालिका (सुधारणा) विधेयक 2016, (मुंबई महानगरपालिकेच्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्यासंबंधात विवक्षित तरतुदींमध्ये सुधारण करणे). 4) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (पाचवी सुधारणा) विधेयक, 2016.

संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, 2015.

प्रख्यापित अध्यादेश - 1) महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) विधेयक 2016. 2) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2016 (महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या नागरिकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी नवीन प्रभाग करण्याबाबत तरतुदी). 3) महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) अध्यादेश 2016. 4) महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) अध्यादेश 2016. 5) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश 2016. 6) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश 2016, 7) महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुढे चालू ठेवणे) अध्यादेश 2016. 8) महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड (सुधारणा) अध्यादेश 2016 9) महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड (दुसरी सुधारणा) अध्यादेश 2016, 10) महाराष्ट्र विद्यापीठ (निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे आणि विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे तदर्थ घटित करणे) अध्यादेश 2016 11) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, 2016 (मुंबई महानगरपालिकेच्या जमिनी भाडेपट्टयाने देण्यासंबंधात विवक्षित तरतुदींमध्ये सुधारणा करणे).

Post Bottom Ad