जातीय विषमता दूर करुन सलोखा निर्माण करण्याचे आवाहन - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

जातीय विषमता दूर करुन सलोखा निर्माण करण्याचे आवाहन - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

मुंबई, दि. 15 Nov 2016 : 
नाशिक जिल्ह्यातील अनूसूचित जातीच्या वस्तीवर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात समाजातील सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी समाजात निर्माण झालेली जातीय विषमता दूर करुन सलोखा निर्माण करण्याचे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

मंत्रालयात आयोजित नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या वस्तीवर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे, सदस्य (विधी) सी.एल.थूल, समाजकल्याण आयुक्त पीयूष सिंह, अवर सचिव सामाजिक न्याय सिद्धार्थ झाल्टे, उपसचिव सामाजिक न्याय ज्ञा.ल.सुळ विशेष महानिरिक्षक (नागरी हस्तांतरण) कैसर खालीद, नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, नाशिकचे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण काशिनाथ गवळे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण प्राची वाजे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी या बैठकीमध्ये नाशिकमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये म्हणून यावर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यात याव्यात, तसेच दंगलीतील पिडीतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व दोषी असलेल्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी यावेळी दिले.

Post Bottom Ad