मुंबई 16 Nov 2016 - वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात 310 क्रमांकाच्या डबल डेकर बसला अपघात झाला. बस वांद्रे रेल्वे स्थानकावरुन कुर्ल्याच्या दिशेन जात होती. दुपारी 12.40 वाजता फॅमिली कोर्टा समोर ओव्हरटेक करताना एका झाडाला बसची धडक बसली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 6 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जखमींमध्ये काही शाळकरी मुलांचादेखील समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच अपघातात बसच्या वरच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातामधील फरहान शेख -18, मनोज सरोज - 22, मुश्रफ सरोज - 16, संतालाल सरोज - 39, सुबोध सिंग - 40 या प्रवाश्यांवर बांद्र्याच्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये तर प्रफुल्ल मोरे - 35, अरविंद संघानी - 45 या दोघांवर पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.