दिवसभर सुट्ट्या पैशाअभावी सर्वसामान्यांना मनस्ताप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिवसभर सुट्ट्या पैशाअभावी सर्वसामान्यांना मनस्ताप

Share This
मुंबई / प्रतिनिधी 9 Oct 2016 - पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने घराघरात, नाक्यावर, मार्केट मध्ये, रस्त्यावर, रेल्वेत आणि बस स्टॉपवर दिवसभर नोटांचीच चर्चा सुरू होती. बुधवारी बँका, एटीएमही बंद असल्याने अनेकांची अडचण झाली. मुंबईबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांना नाश्ता, जेवणासाठी सुट्टे पैसे नसल्याने गैरसोय झाली. काही मेडीकलमध्ये 500 रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याने अनेकांना मनस्ताप स्विकारावा लागला. बेस्ट तसेच महापालिकेच्या भरणा केंद्रात आज सकाळीच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाहीत असे फलक लावले होते. मात्र त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

रूग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्किपशनवर पाचशे हजार रूपयांच्या नोटांवर व्यवहार करता येतील व औषधे मिळतील असेही जाहीर करण्यात आले आहे. मात्र मुंबई बाहेरील पेशंट मुंबईच्या अनेक रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्या रूग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी नास्तासाठी सुट्टयांच्या गैरसोयीला सामोरे जावे लागले असे एका रूग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. मुंबईतील रूग्णांमध्ये मुंबईबाहेरील अनेक रूग्ण उपचार सुरू आहेत. घाटकोपर पूर्व येथील एका मेडीकल स्टोअर्सने पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाही असा फलकच लावला होता. त्यामुळे ज्यांना औषधांची तातडीने आवश्यकता होती, पण सुट्टे पैसे नाहीत अशांची धावपळ उडाली.

काळ्या पैशावर गंडांतर
कोणत्याही निवडणुकीत काळया पैशाचा वापर मोठया प्रमाणात होत असतो, त्यावर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. मात्र आयोगाला हुलकावणी देत राजकीय पक्षांकडून छुप्या पध्दतीने हे व्यवहार होत असतात. पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ब्लॅक मनीवर गंडांतर आले आहे. त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षातील मंडळी धास्तावली आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages