महापौर सभागृह नेत्यांच्या शिष्टाईनंतरही सहाय्यक आयुक्त गांधी यांच्या बदलीची ऑर्डर नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2016

महापौर सभागृह नेत्यांच्या शिष्टाईनंतरही सहाय्यक आयुक्त गांधी यांच्या बदलीची ऑर्डर नाही

मुंबई / प्रतिनिधी - 9 Nov 2016
मुंबई महापालिकेच्या आर मध्य वार्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची बदली केल्याने स्थानिक नगरसेवकानी उपोषण सुरु केले. उपोषणाच्या ठिकाणी महापौर आणि सभागृह नेत्यांनी भेट दिल्यावर आयुक्तांची भेट घेतल्यावर गांधी यांची बदली रद्द केल्याचे सांगण्यात येत असले तरी बदलीची ऑर्डर मात्र निघालेली नव्हती.

आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने एका मंत्र्यांच्या आदेशावर गांधी यांची बदली करण्यात आली होती. गांधी यांची बदली केल्याने कर्तव्यनिष्ठ अधिकार्याच्या मागे भाजपा वगळता सर्व पक्षीय स्थानिक नगरसेवक उभे राहिले. या नगरसेवकानी वार्ड मधे पुन्हा गांधी यांची नेमणूक करावी म्हणून उपोषण सुरु ठेवले होते. याची दखल घेत महापौर स्नेहल आंबेकर व सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी उपोषणकर्त्या नगरसेवकांची भेट घेतली. उपोषणकर्त्या नगरसेवकांचे म्हणणे महापौर व सभागृह नेत्यांनी आयुक्तांसमोर मांडल्यावर आयुक्तांनी गांधी याना पुन्हा आर मध्य विभागाच्या वार्ड मधे सहाय्यक आयुक्त पदावर बसण्यास सांगितले मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत गांधी यांच्या बदलीचे ऑर्डर मात्र काढण्यात आलेले नव्हते. यामुले गांधी यांनी पुन्हा आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पदाचा चार्ज स्विकारला असला तरी प्रशासनाने त्यांना अद्याप अधिकृतरित्या या पदाचा अधिकृत चार्ज दिलेला नाही.

Post Bottom Ad