मतदार जागृती कार्यक्रमातंर्गत विविध प्राधिकरणाच्या प्रतिनिधींची पूर्वतयारी बैठक संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2016

मतदार जागृती कार्यक्रमातंर्गत विविध प्राधिकरणाच्या प्रतिनिधींची पूर्वतयारी बैठक संपन्न

मुंबई / प्रतिनिधी 17 Nov 2016
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱया मतदार जागृती कार्यक्रमातंर्गत मुंबईतील शासकीय व निमशासकीय प्रधिकरणाच्या प्रतिनिधींची पूर्वतयारी बैठक अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात आज (दिनांक १७ नोव्हेंबर, २०१६) पार पडली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यावेळी उपस्थित प्राधिकरणाच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणूकीत मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून कुठल्याही दबावाला व  आमिषाला बळी न पडता नागरिकांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान करावे. यासाठी मतदार जागृती कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. उपस्थित प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी आपआपल्या कार्यकक्षेत विविध माध्यमांचा उपयोग करुन मतदानाचा संदेश नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन डॉ. संजय मुखर्जी यांनी यावेळी केले. 
बैठकीला उपायुक्त (करनिर्धारक व संकलक) डॉ. बापू पवार, सहाय्यक आयुक्त (कनिर्धारक व संकलक) संजोग कबरे,राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, आहार संघटना या प्रधिकरणांचे प्रतिनिधी उप॑स्थित होते.

Post Bottom Ad