जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१६-१७ साठी अर्ज पाठविण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2016

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१६-१७ साठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई दि. 17 : जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी प्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट क्रीडापटू (एक पुरुष/एक महिला खेळाडू), गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांनी विहित नमुन्यातील अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, सायन- बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपोशेजारी, धारावी, सायन (प.), मुंबई- ४०० ०१७ येथून विनामूल्य प्राप्त करुन घ्यावेत. सदर पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दूरध्वनी क्रमांक : 022- 65532373) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad