दहावी बारावी परिक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढविणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

दहावी बारावी परिक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढविणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई दि. 15 Nov 2016 -
दहावी आणि बारावीच्या सुमारे २२ लाख विद्यार्थ्यासाठी त्यांचे परिक्षांचे अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी परिक्षेचा अर्ज आधी भरावा आणि शुल्क नंतर भरावे, तरीही ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याचे शिल्लक असल्यास अशा विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षेला बसणा-या कोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणीमुळे परिक्षेला बसता येणार नाही असे होणार आहे असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दहावी आणि बारावीच्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना जुन्या नोटांमुळे प्रवेश शुल्क भरताना अनेक अडचणी येत आहे. याबाबतच्या काही तक्रारी शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांनी केल्या होत्या असे सांगताना तावडे म्हणाले की, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता प्रथम फॉर्म भरावा आणि नंतर शुल्क भरावे, त्यासाठी या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे विदयार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांना चिंता करण्याचे काहीही कारण नाही असेही त्यांनी सांगितले.

दहावीच्या परिक्षेला सुमारे १७ लाख तर बारावीच्या परिक्षेला सुमारे १४ लाख विद्यार्थी यंदा परिक्षेला बसणार आहेत अशी माहिती देताना तावडे म्हणाले की बारावीच्या विद्यर्थ्यांचे परिक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया जवळ जवळ संपली आहे. तरीही ज्या वि्दयार्थ्यांनी शुल्क भरले नाही त्यांनाही सवलत देण्यात येईल.

Post Bottom Ad