मुंबई / प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेने गेल्या चार वर्षात २६ विविध प्राधिकरण, कंपन्यांकडून उपयोगित सेवा पुरविण्यासाठी रस्त्यांवर चर खोदण्यासाठी दिलेल्या परवांग्यामधून सुमारे ८३६.९५ नफा मिळवला. मात्र तरीही, खड्ड्यांवरील खड्डे बुजविले गेले नाही. पालिका ही नफा मिळवणारी कंपनी नसून सदर पैसा खड्यांसाठी खर्च करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी स्थायी समितीत केली.
या विषयावर बोलताना आसिफ झकेरिया यांनी रस्त्यांवर खोदले जाणारे चर हे प्रामुख्याने रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार असल्याचे सांगत हे चर कसे भरणार हे प्रशासनांने स्पष्ट करावे अशी मागणी केली. तसेच, सदर चर भरण्यासाठी डांबर वापरल्याने रस्ते पुन्हा खराब होत असल्याने चर भरण्यासाठी मास्टिकचा वापर करावा, असे त्यांनी सुचविले. त्याचप्रमाणे या संदर्भात न्यायालयात केस सुरु असून त्याचा काय निर्णय झाला आहे. हे हि स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.