राणीबागेत विदेशी प्राणी आणण्याला विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2016

राणीबागेत विदेशी प्राणी आणण्याला विरोध

मुंबई : प्रतिनिधी
राणीबागेतील पेंग्विंनच्या मृत्युनंतरही पालिकेने परदेशी प्राणी व पक्षी आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रीयाही सुरू झाल्याचे समजते. पण पालिकेने घेतलेल्या या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. एवढेच नाही तर थेट सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीला पत्र पाठवून खरेदी थांबवण्याची मागणी केली. 
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचा (राणीबाग) पालिकेने विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्राणीसंग्रहालयात देशी-विदेशी प्राणी आणण्यात येणार आहेत. यापैकी जुलैमध्ये आठ हंबोल्ट पेंग्विनचे आगमन झाले. पण अवघ्या तीन महिन्यात एका पेंग्निचा मृत्यु झाल्यामुळे पालिका प्रशासनच नाही तर पेंग्विन आणण्यासाठी हट्ट धरणारी शिवसेनाही अडचणीत आली. पेंग्विनच्या जीवाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने थेट लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. एवढेच नाही तर पेंग्विनला परत पाठवण्याची मागणी सर्वच पक्षाने लावून धरली आहे. तर पेंग्विनला येथील वातावरण योग्य नसल्याचे सांगत सामजिक संस्थांनीही विरोध केला आहे. त्यामुळे राणीबागेतील पेंग्विनचे वास्तव्य धोक्यात आले आहे. पेंग्विनला सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या पालिकेने आता एक पाऊल पुढे टाकत, देशी व परदेशी पाहूणे आणण्याचा निर्णय घेतला आहे. यात लांडगा, कोल्हा, नीलगाय, सिंह, देशी अस्वल, पाणमांजर, जिराफ, मद्रास कासव या प्राण्याचा समावेश असल्याचे समजते. याला विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी आक्षेप घेतला आहे.

Post Bottom Ad