डाळी व तेलबिया लागवडीच्या उत्तेजनासाठी किमान आधारभूत किंमतीला मंजूरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2016

डाळी व तेलबिया लागवडीच्या उत्तेजनासाठी किमान आधारभूत किंमतीला मंजूरी

मुंबई, दि. १७ डाळी व तेलबिया लागवडीस उत्तेजन मिळावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामाकरिता डाळी व तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीला मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक बैठकीमध्ये सन २०१६ -१७ च्या खरीप हंगामाकरिता किमान आधारभूत किंमतीला मंजूरी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने तूर, उडीद, व मूगडाळीस प्रतिक्विंटल ४२५ रुपये तर तीळाला २०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला आहे. तर भूईमुग, सूर्यफुलाच्या बिया, कारळे आणि सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल २७७५ दर दिला असून यामध्ये १०० रुपये बोनस देण्यात येणार आहे. कापूस मध्यम धाग्याकरिता ३८०० रुपये प्रतिक्विंटल दर दिला असून ६० रुपये बोनसचा समावेश आहे. कापूस लांब धाग्याकरिता ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर असून त्यात ६० रुपये बोनसचा समावेश आहे. डाळी व तेलबिया लागवडीकरिता उत्तेजन मिळावे तसेच मागणी व पुरवठ्यामधील अंतर्गत तफावत भरून निघावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१६-१७ च्या खरिप हंगामाकरिता किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल अशी – धान (सामान्य) – १४७० रुपये, धान ग्रेड ए -१५१०, ज्वारी (संकरित) -१६२५ रुपये, ज्वारी मालदांडी १६५० रुपये, बाजरी – १३३० रुपये, मका १३६५ रुपये, नाचणी -१७२५ रुपये, तूर – ५०५० रुपये (४२५ रुपये बोनस धरून), मूग – ५२२५ रुपये (४२५ रुपये बोनस धरून), उडिद -५००० रुपये (४२५ रुपये बोनस धरून), भूईमूग – ४२२० रुपये (१०० रुपये बोनस धरून), सोयाबीन २७७५ (१०० रुपये बोनस धरून), सूर्यफूल – ३९५० रुपये (२०० रुपये बोनस धरून), कारळे – ३८२५ रुपये (१०० रुपये बोनस धरून), तीळ – ५००० रुपये (२०० रुपये बोनस धरून), कापूस (मध्यम धागा) – ३८६० रुपये, कापूस (लांब धागा) – ४१६० रुपये.

Post Bottom Ad