रविवारी समाजवादी पार्टी तर्फे "परिवर्तन रथ यात्रा" मुंबई महापालिका प्रचाराला सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रविवारी समाजवादी पार्टी तर्फे "परिवर्तन रथ यात्रा" मुंबई महापालिका प्रचाराला सुरुवात

Share This
मुंबई: 26 नोव्हेंबर 2016
समाजवादी पार्टी सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून मुंबईच्या विविध भागात पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. उत्तर मुंबई परिसरात समाजवादी पार्टीचा चांगलाच जोर असून रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी याच परिसरातून "परिवर्तन रथ यात्रा" भव्य प्रचार रॅलीद्वारे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. या रॅलीचे नेतृत्व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असिम आझमी हे करणार असून पहिल्याच सभेत ते काय बोलतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
रविवारी दुपारी 2 वाजता कांदिवली पुर्व येथील समता नगर पोलीस ठाणे येथुन रॅलीला सुरुवात होईल. सर्व कार्यकर्ते मोटरसायकलींसह या रॅलीत सहभागी होणार असून ही रॅली ईस्टर्न एक्सप्रेसवे वरुन अयप्पा मंदिर,हनुमान नगर,दामू नगर,वैशाली नगर,केतकी पाड़ा मार्गे कांदिवली पश्चिमेला पोहोचणार आहे. त्यानंतर मालाड मालवणी मार्गे मालाड पश्चिमेच्या मालवणी गेट क्रमांक आठ येथील म्हाडा ग्राऊंडमध्ये पोहोचल्यानंतर या रॅलीचे रूपांतर जनसभेत होईल. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांच्यासह समाजवादी पार्टीचे अन्य नेतेही सभेला संबोधित करतील. त्यानंतर रात्री आठ वाजता एक भव्य मुशायरा आयोजित करण्यात आला आहे. समाजवादी पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या पहिल्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आझमी यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages