छत्रपती शाहू महाराज आंतरजातीय विवाह कायदा आणणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2016

छत्रपती शाहू महाराज आंतरजातीय विवाह कायदा आणणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

मुंबई, दि. 9 : छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली आंतरजातीय विवाह कायदा आणला होता. त्या अनुषंगाने आंतरजातीय व आंतरधर्मिया विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी व समाजातील विषमतेला आळा घालण्यासाठी छत्रपती शाहू महाराज आंतरजातीय व आंतरधर्मिय कायदा आणणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील आंतरजातीय विवाह कायदा याविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विधी व न्याय प्रधान सचिव प्रकाश माळी, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे, सदस्य थूल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बडोले म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली जो कायदा आणला होता त्या अंतर्गत राज्यामध्ये आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाहांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आपत्यांना संरक्षण व आर्थिक योजनांचा लाभ देण्यासाठी अशा प्रकारची तरतूद या कायद्यात असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून 5 लाख रुपयांची तरतूद, त्यांच्या अपत्यांना संरक्षण, शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी, वसतिगृहामध्ये प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी, सामाजिक बहिष्कार याबाबतच्या येणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

Post Bottom Ad