सुरक्षित रस्ते प्रवासासाठी प्रभावी उपाययोजना राबवा - परिवहन मंत्री दिवाकर रावते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2016

सुरक्षित रस्ते प्रवासासाठी प्रभावी उपाययोजना राबवा - परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई, दि. 9 : रस्त्यांवर होणारे अपघात रोखणे, दारुच्या नशेत वाहन चालविण्याच्या कृतीला पायबंद घालणे, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्यावाहनांच्या तपासणीसाठी ‘वेट सेन्सर’ लावणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये वर्दळीच्या ट्राफिक सिग्नलच्या ठिकाणी सब-वेंची निर्मिती करणे यासहसुरक्षित रस्ते प्रवासाच्या दृष्टीने विविध महत्वाच्या विषयांवर आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य रस्ता सुरक्षापरिषदेच्या चौथ्या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यातील रस्ते प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणेराबविण्यात याव्यात, असे मंत्री रावते यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, अतिरिक्त पोलीसमहासंचालक (वाहतूक) पद्‌मनाभन, परिवहन आयुक्त प्रविण गेडाम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, सह पोलीस आयुक्त(वाहतूक) मिलिंद भारंबे, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितहोते.

दारुच्या नशेतील वाहतुकीला रोखण्यासाठी हॉटेल संघटनांसमवेत बैठक
दारुच्या नशेत वाहन चालविल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. यावर पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. हे अपघातरोखण्यासाठी प्रबोधन करणे आणि नशापानास प्रतिबंध करण्याच्या कामी महामार्गावरील रेस्टॉरंट, धाबे यांचाही सहभाग घेणे आवश्यक असून त्यासाठीहॉटेल संघटनांसमवेत बैठक घेण्यात यावी, असे निर्देश याप्रसंगी मंत्री रावते यांनी दिले.

ओव्हरलोड वाहतुकीला रोखण्यासाठी वेट सेन्सर
ओव्हरलोड वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी अशा वाहनांची ओळख पटण्याच्या दृष्टीने रस्त्यांवर ‘वेट सेन्सर’ लावणे आवश्यक आहेत.टोल नाक्यांवर असे वेट सेन्सर लावता येतील. प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही मंत्री रावते यांनी यावेळीसांगितले.

ब्लॅक स्पॉट दुरुस्तीसाठी रस्ते सुरक्षा निधीतून निधी देऊ
महामार्गावरील ब्लॅक स्पॉट सुनिश्चित करुन त्याची दुरुस्ती करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्यामहामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पण तरीही आवश्यकता वाटल्यास राज्याच्या रस्ते सुरक्षानिधीतुनही ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मंत्री रावते यांनी यावेळी सांगितले. मुंबई शहरांतील ब्लॅक स्पॉटच्यादुरुस्तीसाठी महापालिकेसही रस्ता सुरक्षा निधीतून निधी उपलब्ध करुन देऊ. यासाठी परिवहन विभाग व मुंबई महापालिका यांनी एक संयुक्त बैठक घेऊनउपाययोजना ठरवाव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

वर्दळीच्या सिग्नलच्या ठिकाणी सब-वेंची निर्मिती
महानगरांमध्ये वर्दळीच्या सिग्नलच्या ठिकाणी सब-वेंची निर्मिती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मुंबईत पादचाऱ्यांचे सुमारे 60 टक्के अपघात हे वर्दळीचे रस्ते ओलांडताना होतात. ते रोखणे व ट्राफिक जामच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये वर्दळीच्या सिग्नलच्या ठिकाणीअसे सब-वे निर्माण करणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भात महत्वाचे वर्दळीचे सिग्नल निर्धारित करुन गतिमान कार्यवाही करावी, अशा सूचनामंत्री रावते यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Post Bottom Ad