एलफिन्स्टन रोड व परळ स्टेशन येथील पूल चौपदरी करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एलफिन्स्टन रोड व परळ स्टेशन येथील पूल चौपदरी करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव

Share This
मुंबई / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणांचा पाहणी दौरा केला. या दौ-या दरम्यान उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (परिमंडळ-२) आनंद वागराळकर, संबंधित सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते) संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दादर परिसरात असणा-या सेनापती बापट मार्गावर महापालिकेचा एक एकर आकाराचा भूखंड आहे. हा भूखंड सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. मात्र या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणात घनकचरा व्यवस्थापन खाते (S.W.M.), पर्जन्यजल वाहिन्या खाते (S.W.D.) व मलनिःसारण प्रचालने खाते (S.O.) या तिनही खात्यांचे निरुपयोगी सामान / भंगार सामान / निरुपयोगी वाहने ठेवण्यात येत आहे. या सर्व निरुपयोगी सामानाची येत्या १५ दिवसात विल्हेवाट लावून हा भूखंड मोकळा करावा, जेणेकरुन महापालिकेच्या इतर आवश्यक बाबींसाठी तो वापरता येईल; असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त शहर यांना दिले आहेत.

परळ व दादरच्या पूर्व बाजूला असणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्ग यांना जोडणारा; तसेच पश्चिम रेल्वेचे एलफिन्स्टन रोड स्थानक व मध्य रेल्वेचे परळ स्थानक यांच्यावरुन जाणारा पूल सध्या दोन मार्गिकांचा आहे. हा पूल तेथील वाहतूकीला तुलनेने अपुरा असल्याने तिथे सातत्याने वाहतूक खोळंबत असते. ही बाब लक्षात घेऊन हा पूल चार मार्गिकांचा करण्याबाबत प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) व प्रमुख अभियंता (पूल) यांना दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages