"काँग्रेसकडून आघाडीचा अधिकृत प्रस्ताव येत नाही, तोवर राष्ट्रवादी काँग्रेस करणार स्वबळाची तयारी' - सचिन अहिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

"काँग्रेसकडून आघाडीचा अधिकृत प्रस्ताव येत नाही, तोवर राष्ट्रवादी काँग्रेस करणार स्वबळाची तयारी' - सचिन अहिर

मुंबई / प्रतिनिधी - 8 Nov 2016
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आघाडीचा अधिकृत प्रस्ताव येत नाही, तोवर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत राहिल, अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्जाचे वितरण सध्या सुरू असून आतापर्यंत तब्बल ४५० इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहितीही अहिर यांनी दिली.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून स्वबळावर निवडणुक लढण्याची आवश्यकता भासल्यास पक्षाची यंत्रणा सज्ज असावी, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. काँग्रेससोबत आघाडीच्या शक्यतेबाबत विचारले असता मा. अहिर म्हणाले की, वेळेत काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव आला तर आमची त्यावर चर्चेची तयारी असेल. मात्र जाेपर्यंत आघाडीचा अधिकृत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आमची स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू राहिल. ज्या प्रभागात आमची ताकद आहे, तिथे आम्ही अधिक जोर लावणार असून शक्यतो महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २२७ प्रभागात उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू असून त्यासाठी इच्छुकांची मते आजमावून घेतली जात आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असून आतापर्यंत तब्बल साडेचारशे इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याची माहितीही मा. अहिर यांनी दिली. १९ नोव्हेंबरपर्यंत हे उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान पक्षातर्फे नियुक्त करण्यात आलेली जिल्हा निवडणुक छाननी समिती इच्छुक उमेदवारांच्या तालुकानिहाय मुलाखती घेणार असल्याचे ते म्हणाले.

Post Bottom Ad