मुंबई (प्रतिनिधी) : राणीबाग येथील प्राणि संग्रहालयातील पेंग्विनच्या मृत्यूबाबत पालिका प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला. यावेळी पेंग्विनचा मृत्यू हा संबंधित कंत्राटदाराने केलेला खुनच असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी आज स्थायी समितीत केला.
पेंग्विन आणल्यानंतर त्यांना सांभाळण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटानुसार कंत्राटदाराकडून कामे होत नाहीत त्यांच्याकडे पेंग्विनसाठी कुठलाही तज्ञ् नाही , मॅटर्निटी डौक्टर नाहीत . प्रशासनाकडून याबाबत कोणताच खुलासा झालेला नाही . पेंग्विनसाठी जी वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे त्यात पालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. , यासर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली . यावर पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी हे सर्व आरोप खोडून काढत पेंग्विनसाठी न्यूझीलंडमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या डा . मधुमिता यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांनीही आटोकाट प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने उपचाराला दाद न मिळाल्याने एका पेंग्विनचा मृत्यू झाला , त्यांच्या खाण्यातही लक्ष दिले जात असून त्यांच्या साठी स्वच्छ करून खात्री करून बोंबील खाद्य म्हणून दिले जाते . दरम्यान ज्या कंत्राटदाराला सादर कंत्राट दिले होते त्याची १ कोटी ४० लाखाची बँक गॅरंटी सील केली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले .