मुख्यमंत्र्यांची स्वच्छ छबी एक ढोंग आहे - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2016

मुख्यमंत्र्यांची स्वच्छ छबी एक ढोंग आहे - संजय निरुपम

मुंबई (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी स्वच्छ छबी आहे, ती एक ढोंग आहे. भ्रष्टाचाराची झालर त्यालाही लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने काही लँड डिलिंग झाल्या आहेत आहेत ज्या संशयास्पद आहेत असा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महाराष्ट्र सरकारला २ वर्ष झाली मुख्यमंत्र्यांनी १ आठवडा भरपूर मुलाखती दिल्या, पण मुळात महाराष्ट्राची स्थिती पाहता महाराष्ट्रात काहीही होत नाहीये, मेक इन इंडियाचा मोठा शो झाला ज्यात २६०० MOU झाले असे सांगण्यात आले, यात ८ लाख ५ हजार कोटींची गुंतवणूक येईल असे म्हटले होते. पण आता पर्यंत ०.५ कोटी एवढीच गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत ३०० ते ३२५ कंपन्यांनी सरकारकडे जमिन मागितली आहे. फॉक्सकोन ही चीनची एक मोठी कंपनी भारतामध्ये इन्वेस्टमेंट करणार आहे असे त्या वेळी सांगण्यात आले होते. त्या फॉक्सकोन ने आपला पूर्ण प्रोजेकट् गुंडाळला आहे. ज्याची कारणे बरीच आहेत. ३५ हजार कोटींचा हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते पण तस झालं नाही. क्वीन्सटार ही कंपनी ६८ हजार कोटींचा प्रोजेक्ट आणणार होती. पण त्यांनी अजूनही जमिनीसाठी मागणी केलेली नाही. जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत. त्यामध्ये कोस्टल रोड प्रोजेक्ट ज्याला अजून परमिशन अजून मिळाली नाही. बुलेट ट्रेनसाठी अजून जमीन मिळाली नाही. भाजपावाले म्हणतात की काँग्रेसच्या सरकारमध्ये फक्त एक मोनोरेल आणि एक मेट्रो ट्रेन मुंबई मध्ये आणली. पण आम्ही तर ३ मेट्रो सुरु केली. पण आजू एकही मेट्रोचे काम सुरु झाले नाही.

पहिला जमिनीचा व्यवहार बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीशी झाला या कंपनीला नागपुरात २३० एकर जमीन २५ लाख रुपये प्रती एकरच्या भावाने MADC ने दिली आहे. मुळात ज्या जमिनीची किंमत १ कोटी रुपये प्रति एकर आहे. जी मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर दिली गेली आहे. कारण मुख्यमंत्री MADC चे चेअरमन आहेत. त्यामध्ये MADC ला १७० करोड चे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई इतर कंपन्यांना १५% चढ्या भावाने जमीन देऊन करण्यात येईल असे MADC कडून सांगण्यात आले. दुसरा जमीन व्यवहार अनिल अंबानी यांच्याशी झाला. अनिल अंबानी यांना रिलाइन्स एअरोस्पेस या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकरिता १११ एकर जमीन ५७ लाख प्रति या भावाने MADC च्या माध्यमाने दिली गेली आहे. सुरवातीला या कंपनीला ४६८ एकर जमीन दिली जाणार होती. अनिल अंबानी यांच्या कडे डिफेन्स च्या संदर्भात कुठलाही अनुभव नाही असं असतानाही हे काम झाले आहे.

Cold Play या ब्रिटिश म्यूजिकल बँड कंपनीला ७०% discount मध्ये MMRDA ची जमीन वापरायला परवानगी दिली गेलीय. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) विभागातील ही जमीन आहे. त्यातही केवळ स्टेज चे शुल्क आकारले जातेय. त्यांना ग्राउंड मोफत वापरायला मिळणार आहे. MMRDA ने यावर आक्षेप घेतलाय. पण केंद्राचा दबाव असल्याने हे सगळे केलं जातेय. हे इलेक्शन campaign साठी केलं जातेय. याबाबत निरुपम उद्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या विचारात आणि तयारीत मुंबई काँग्रेस नाही, असा स्थानिक पातळीवर निर्णय झाला आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. सदर पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी आमदार चरण सिंग सप्रा, उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन उपस्थित होते.

Post Bottom Ad