सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार!: राधाकृष्ण विखे पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार!: राधाकृष्ण विखे पाटील

Share This
मुंबई, दि. 5 नोव्हेंबर 2016:
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत करण्याबाबत सभागृहात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होवू न शकल्याने, सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, अर्थसंकल्पीयअधिवेशनात 13 मार्च 2015 रोजी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहामध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे देण्यात येणा-या मदतीबाबत सुतोवाच केले होते. यामध्ये सरकारतर्फे देण्यात येणा-या 1 लाख रुपयांच्या मदतीत वाढ करुन ही मदत 5 लाख रुपयांपर्यंत देण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी लगेचच होणार असल्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले होते,याकडे लक्ष वेधत विखे पाटील यांनी सरकारचे हे आश्वासन खोटे ठरले असल्याची टीका यावेळी केली.

सरकारच्या या भूमिकेबाबत माहिती अधिकाराच्या माध्यमातून पुढे आलेल्या माहितीवरुन सरकारच्या या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. विखे पाटील यांनी सांगितले की, घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांचीमालिका दाखविणारे हे सरकार असून, निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शेतक-यांच्या आत्महत्येबाबत पुर्णपणे असंवेदनशील भूमिका सरकारची उघड झाली आहे. सरकारच्या या खोटेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी हक्कभंग दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages