बेस्ट प्रशासनाच्या मनमानी विरोधात सभा तहकूब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

बेस्ट प्रशासनाच्या मनमानी विरोधात सभा तहकूब

मुंबई, 15 नोव्हेंबर 2016 -
तब्बल १३ वर्षानंतर बेस्ट मध्ये बस चालकांची मेगा भरती होत असताना बेस्ट अध्यक्ष व समिती समिती सदस्यांना ह्याची कोणतीही माहिती दिली नाही हा बेस्ट समिती सदस्यांचा अपमान असल्याचे सांगत बेस्ट समिती सभा आज तहकूब करण्यात आली. बेस्ट सामिती सदस्यांना कोणतीही किंमत न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्व पक्षीय बेस्ट समिती सदस्यांनी केली .

बेस्ट प्रशासनाने तब्बल ९०० बसचालकांच्या भरतीची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली . मात्र ह्या बाबतीत बेस्ट समिती अध्यक्ष व बेस्ट समिती सदस्यांनाही अंधारात ठेवले . ह्या जाहिरातीत बसचालकांना वेतन महिना १८००० रुपय निश्चित ठेवले आहे ह्यामुळे बेस्टवर वर एकूण २० करोड रुपयांचा बोजा पडणार आहे . हा खर्च कुठून करणार , त्याची तजवीज कोठून करणार ? मागे काही महिन्यांपूर्वी ज्या ४००बस चालकांना या ना त्या कारणांमुळे कामगारांना निलंबित करण्यात आले होते, त्या चालकाना पुन्हा सेवेत घेण्याचे ठरले होते , त्या बसचालकांना ह्या चालकांमध्ये समावुन घेणार का ? बस चालकांची भरती बेस्ट करणार आहे मग , बस वाहकांचे काय ? का ह्यापुढे बस वीनावाहक धावणार आहेत का ? मग हि तर बेस्ट मध्ये कामगार कपात तर लागू होणार आहे का ? असे असंख्य सवाल बेस्ट समिती सदस्यांनी यावेळी विचारले. हे सर्व जाणूनबुजून होत असून ह्यापूर्वीही बेस्ट समिती सदस्यांना अंधारात ठेऊन अनेक निर्णय घेण्यात आले होते तरी संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ तेथून हकालपट्टी करावी. अशी मागणीही समिती सदस्यांनी केली.

त्यावर बेस्ट समिती अध्यक्ष मिठबावकर यांनी आपणास हि विश्वासात घेतले नसल्याचे कबुल केले . बेस्ट मध्ये २००३ सालापासून भरती झालेली नाही , तसेच बेस्ट मध्ये अनुकंपा तत्वावर हि भरतीची यादी मोठी आहे. त्यामुळे ह्या नव्या भरती मध्ये अनुकंपा तत्वावर भरतीसाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले .

Post Bottom Ad