मुंबई दि. 10 Nov 2016 -
500 आणि 1000 च्या नोटा व्यवहारातून बाद केल्यामुळे निर्माण झालेल्या चलन तुटवडयावर मात करण्यासाठी 350 कोटी रुपये मूल्य असलेल्या दोन हजारच्या नव्या नोटा व्यवहारासाठी मुंबईत उपलब्ध करुन दिल्या आहेत अशी माहिती महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 2 हजारच्या नव्या नोटा बँकांकडे वितरीत करण्यात आल्या आहेत. 500 आणि 1000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी मुंबईत सर्वच बँकाबाहेर रांगा लागल्या आहेत. या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे.