सर्वांसाठी घरे देण्याचे स्वप्न सर्वांनी मिळून साकार करुया- मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2016

सर्वांसाठी घरे देण्याचे स्वप्न सर्वांनी मिळून साकार करुया- मुख्यमंत्री

मुबंई, दि. 10 : सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. दैनिक इकॉनॉमिक टाइम्सतर्फे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे वास्तुविशारद, डिजायनर्स, अभियंता, विकासक, करार कंपनी आणि इतर औद्योगिक तज्ज्ञ यांची सेवा एकाच छताखाली घेण्यासाठी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकसंख्येतील वाढीमुळे घरांच्या गरजेत वाढ होत आहे. मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे शक्य होत नाही. कररचनेबाबत बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मतांचाही विचार केला जाईल. यासाठी शासन आणि उद्योगक्षेत्राने एकत्र येऊन योग्य मार्ग काढण्यात येईल. योजनांच्या अंमलबजावणीत उद्योगांसाठी अनुकूल वातावरण राहील याची दक्षता शासन घेत आहे. गतिमान प्रशासनासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मची तरतूद असल्यामुळे विविध परवाने मिळण्याच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होईल. शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्वाच्या योजना तयार केल्या आहेत, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले की, प्रवासाच्या विविध साधनांसाठी एकच तिकीट देण्याचाही विचार करुन त्यामुळे प्रवास करणे सुकर होणार असून वेळेची बचत होणार आहे.

Post Bottom Ad