राज ठाकरे हे समांतर सरकार चालवत आहेत का ? - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2016

राज ठाकरे हे समांतर सरकार चालवत आहेत का ? - संजय निरुपम

मुंबई - रईस चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या परवानगीसाठी शाहरुख  खान राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता. चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी राज ठाकरेंकडे मागायला राज ठाकरे असे आहेत तरी कोण? असं काय झाल की सेन्सॉर बोर्डाच्या परवानगी ऐवजी चित्रपट निर्माते आणि कलाकारांना राज ठाकरे यांचे दरवाजे ठोकावे लागतायेत. राज ठाकरे हे काय समांतर सरकार चालवत आहेत का, याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.



मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची शरम वाटायला हवी. या चित्रपट प्रदर्शनाला अभय देण्याचे काम सरकारचे आहे. माय नेम ईज खानच्या वेळी शिवसेनेने विरोध केला होता त्यावेळी आमच्या सरकारने हा चित्रपट प्रदर्शित करु दिला. कायदा व सुव्यवस्थाची जबाबदारी ही सरकारची आहे. देशभक्तीच्या नावाखाली काही लोकांची हप्ते खोरी सुरू आहे. या गोष्टीला भाजपा सरकारचे सुद्धा अभय आहे. म्हणूनच मुख्यमंत्री मुद्दामहून राज ठाकरेंबद्दल जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण करत आहेत. राज ठाकरे यांना कोणी भेटायला गेल हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र हप्ते वसुली करणाऱ्यांना आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

Post Bottom Ad