मुंबई : १२ डिसेंबर
देशात असलेल्या उपेक्षित, बंजारा, तमाम भटकेविमुक्त, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती बंजारा नाका कामगार संघटनेतर्फेत सोमवारी मुंबईतील बजार गेट पारसी गेट नाका, फोर्ट येथे साजरी करण्यात आली. लोकनेते मुंडे यांनी आपल्या आयुष्यात कामगार कष्टकरी आणि उपेक्षितांसाठी कार्यकेल्याची आठवण करून नाका कामगारांकडून यावेळी अभिवादन करण्यात आले. यावेळी सकाळी ९.३० वाजता गोपीनाथ मुंडे, संत सेवालाल महाराज आदी महापुरुषांचे छायाचित्र असलेल्या पत्रकांचे वाटप करून मुंडे यांच्या कार्यांची माहिती देण्यात आली. तर संत सेवालाल महाराज आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा जयघोषण करण्यात आला.राज्यातील नाका, बांधकाम आदी असंघटीत कामगारांच्या नोंदणीसाठी ९० दिवसांऐवजी ३० दिवसांची मुदत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बंजारा नाका कामगारांच्याबंजारा नाका कामगार संघटनेकडून १ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१७ या कालावधीत राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक शहर तालुक्यातही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विचार आणि त्यांचे कार्यक पोहोचविण्याचे काम सुरू असून त्याच पार्श्वभ•ाूमीवर मुंबईतील अनेक नाक्या-नाक्यांवर मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरकारने राज्यातील नाका कामगार, बांधकाम कामगार यांच्या सर्वांगितण विकासासाठी राष्टÑसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे महामंडळ स्थापन करण्यात यावे, या कामगारांना रोजगाराची सुरक्षा द्यावी आदी मागण्याही संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष अॅड. नरेश राठोड यांनी केल्या. मुंडे यांच्या या अभिवादन स•ोला, नारायणदादा आडे बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख व बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रचारक प्रकाश आडे, उल्हास राठोड, विठ्ठल जाधव, समाधान करंदेकर, एस.के. चव्हाण, कुमार चव्हाण, के. नरसिंगराव, बी. कृष्णा, पांडुरंग डोपावकर आदी विविध प्रकारचे कार्य करणारे नाका कामगार उपस्थित होेते..