मुंबईचे नगरसेवक होणार नॉट रिचेबल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2016

मुंबईचे नगरसेवक होणार नॉट रिचेबल

ल्यापटॉपही परत घेण्याची कारवाई सुरु
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक फेब्रुवारी मार्च 2017 मध्ये होत असल्याने पालिकेने मुंबईच्या नगरसेवकांना दिलेले मोबाईल सिम कार्ड परत घेण्यास सुरवात केली आहे, यामुळे आता पालिकेने दिलेल्या नंबरवर नगरसेवक नॉट रिचेबल होणार आहेत. 


मुंबई महापालिकेची निवडणुक फेब्रुवारी 2012 मध्ये संपन्न झाली होती. त्यावेळी निवडूण आलेल्या 227 व नामनिर्देशित 5 अश्या 232 नगरसेवकाना पालिकेने प्रभाग क्रमांकानुसार मोबाइल सिमकार्ड दिले होते. तसेच पालिकेच्या समिती व सभागृहाचे अजेंडे नगरसेवकाना पोहचवता यावेत म्हणून ल्यापटॉप दिले होते. पालिकेने नगरसेवकाना दिलेल्या मोबाइल क्रमांकाचे बिल पालिका भरत असते.

पालिकेची सार्वत्रिक निवडणुक जवळ आल्याने निवडणुक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीच्या 100 दिवस आधी आपले सिमकार्ड जमा करावे असे पत्र पालिकेच्या चिटणीस विभागाने नगरसेवकाना पाठवले आहे. 14 डिसेंबर पासून नगरसेवकाना आपले सिमकार्ड परत करायची असून 20 डिसेंबर पासून पालिकेने प्रभागानुसार दिलेले नंबर बंद होणार आहेत. यामुळे आता नगरसेवकांना त्यांच्या खाजगी क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. मोबाईल सिमकार्ड प्रमाणेच पालिकेने नगरसेवकाना ल्यापटॉप दिले आहेत. हे ल्यापटॉपही आता परत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

याबाबत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्याशी संपर्क साधला असता नगरसेवकाना पालिकेकडून सिमकार्ड परत करण्यासाठी पत्र पाठवण्यात आली आहेत. मी स्वता बुधवारी 14 डिसेंबरला सिमकार्ड परत करत आहेत. त्याच प्रमाणे ल्यापटॉपही परत करणार असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले. 

Post Bottom Ad