२0१७-२0१८ वर्षाकरिता जुन्याच दराने रंगभूमी कर आकारण्यात येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२0१७-२0१८ वर्षाकरिता जुन्याच दराने रंगभूमी कर आकारण्यात येणार

Share This
मुंबई : मुंबई महापालिकेने मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे यासाठी आकारण्यात येणार्‍या करांच्या दरात २0 मार्च २0१५ रोजी १0 टक्के वाढ केली असली तरी, त्या प्रस्तावाला राज्य शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने २0१७-२0१८ या वर्षाकरिता जुन्याच दराने रंगभूमी कर आकारण्यात यावा असा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर करण्यात आला आहे. 

२0१६-१७ या वर्षातही चित्रपटगृहाच्या श्रेणीचा विचार न करता मुंबईत प्रदर्शित झालेल्या मराठी, गुजराथी चित्रपटांना आणि रंगमंचावर केलेल्या मराठी आणि गुजराथी नाटके, एकपात्री नाट्यप्रयोग आणि तमाशा यांना रंगभूमी करात दिलेली सवलत २0१७-२0१८ या वर्षासाठी पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. सुधारित रंगभूमीकर पालिकेने संमत केले असले तरी, नवीन दर राज्य शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करण्याच्या मंजुरीसाठी किती अवधी लागेल, याविषयी अद्यापपर्यंत काही सांगता येणार नाही आणि याबद्दल राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याने सुधारित दर राज्य शासन ज्या दिनांकापासून राजपत्रात प्रसिद्ध करेल तेव्हापासून अंमलात येणार आहे. रंगभूमीकराच्या दराला २0 मार्च २0१७ रोजी किंवा त्यापूर्वी विधी व स्थायी समिती आणि महापालिकेने मान्यता देणे आवश्यक असल्याने अधिदानातून सन २0१६-१७ साठी दिलेली सवलत २0१७-२0१८ या वर्षासाठी पुढे चालू ठेवावी असे प्रस्तावात सुचवण्यात आले आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार वातानुकूलित चित्रपटगृहात प्रत्येक खेळामागे ६0 रु . (सहा रुपये वाढ), वातानुकूलित नसलेल्या चित्रपटगृहात प्रत्येक खेळामागे ४५ रु . (पाच रु. वाढ), नाटक, जलसा, करमणुकीचे विविध कार्यक्रम आणि तमाशाच्या प्रत्येक खेळामागे २५ रु. (तीन रु. वाढ), सर्कस, आनंद मेळासाठी प्रति दिन ५0 रु. (पाच रु. वाढ), इतर कोणतीही करमणूक किंवा प्रत्येक खेळामागे ३0 किंवा स्वतंत्र खेळ नसल्यास रोज ३0 रु. (तीन रु. वाढ) सुचवण्यात आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages