मुंबई / प्रतिनिधी - पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकार चांगल्या वाईट घटना समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करत असतात. अश्या पत्रकारांना कोणतीही सुरक्षा नसतानाही ते आपले कर्तव्य बजावत असतात यामुळे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षेची गरज असल्याचे मत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केले.
जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेद्वारे पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आंबेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पत्रकार क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने काम करत असल्याने या महिलांना सुरक्षा मिळायला हवी असे आंबेकर म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे मी महापौर पदावर आहे त्याच प्रमाणे पत्रकार किंवा इतर क्षेत्रातील महिला पदावर आहेत यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही विसरू नये असे आवाहन आंबेकर यांनी केले.
लोकशाहीत पत्रकारिता हा चौथा स्तंभ असल्याने पत्रकारिता महत्वाची असली तरी आज ही पत्रकारिता कुठे चालली आहे याचा विचार करण्याची गरज आहे. अनेक चांगल्या कामांना योग्य प्रसिद्धी मिळत नसल्याने वाईट कामा बरोबरच चांगल्या कामालाही योग्य प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा आंबेकर यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणल्यास त्या दूर करण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आंबेकर म्हणाल्या. पत्रकारांना अनेक समस्या, अडीअडचणी असतात त्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका नक्की प्रयत्न करेल अशी ग्वाही आंबेकर यांनी दिली.
सदर पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते शेफाली परब (लोकमत), सपना देसाई (मुंबई समाचार), सुनिल तर्फे (नवाकाळ), महादू पवार (सम्राट), सचिन उन्हाळेकर (जागरूक टाइम्स), जेष्ठ पत्रकार चंद्रकांत लिंगायत तसेच ठाणे, कल्याण, पालघर, मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते, मिरा भाईंदर येथील उद्यानाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देणाऱ्या नगरसेविका नयना वसानी, युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ, उपाध्यक्ष जयराम सावंत, सरचिटणीस हेमंत सामंत, चिटणीस अजेयकुमार जाधव, प्रवीण दवणे, खजिनदार सतिश साटम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज सिंह, मुकीम शेख यांनी विशेष प्रयत्न केले.