मुंबई : तेविसावी आंतर रुग्णालय गिरनार चषक क्रिकेट स्पर्धा येत्या १0 जानेवारीपासून आयोजित करण्यात आली आहे. यंदासुद्धा सीझन क्रिकेट स्पर्धा गिरनार चहा तर्फे पुरस्कृत करण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने होणार असून स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धेमधील सवरेत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यासाठी वैयक्तिक पुरस्कार आहेत.
स्पर्धेमध्ये लीलावती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, के.डी.ए. हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल आदी हॉस्पिटलच्या क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे. मुंबईतील सर्वच रुग्णालयांतील क्रीडापटू अन्य खेळांतील जखमी खेळाडूंना तत्परतेने सहकार्य करत असतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमित होत असलेली आंतररुग्णालय गिरनार चषक क्रिकेट स्पर्धा आता क्रिकेट शौकिनांना मोठय़ा प्रमाणावर आकर्षित करणारी ठरत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटन समितीचे अध्यक्ष जॉय चक्रबर्ती, कार्याध्यक्ष एस. एच. जाफरी, उपाध्यक्ष ए. डी. दुबे, जनरल सेक्रेटरी मिलिंद सावंत आदी मंडळी विशेष कार्यरत आहेत.