" NEET, वैद्यकीय प्रवेश परीक्षा उर्दू भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा" - अबु आझमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

" NEET, वैद्यकीय प्रवेश परीक्षा उर्दू भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा" - अबु आझमी

Share This
मुंबई 9 जानेवारी - राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्टरन्स टेस्ट (NEET) सध्या हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती,बंगाली, आसामी, तेलगु आणि तमिळ अशा आठ भाषांमध्ये घेतली जाते. मात्र या परिक्षेसाठी उर्दू भाषेचा पर्याय उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. त्यामुळे NEET, वैद्यकीय प्रवेश परीक्षा उर्दू भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा,अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु असीम आझमी यांनी केली आहे.
उर्दू माध्यमातून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या परिक्षेसाठी उर्दू भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्याने मुलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगत मा. आझमी यांनी येत्या काळात होऊ घातलेल्या NEET परिक्षेत उर्दूचा पर्याय उपलब्ध करुन घेण्याची मागणी अबु असीम आझमी यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages