मुंबईत 14 मार्चला बहुजन हक्क संवर्धन मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 January 2017

मुंबईत 14 मार्चला बहुजन हक्क संवर्धन मोर्चा

मुंबई / प्रतिनिधी -
एट्रोसिटी कायदा रद्द करू नए या व बहुजन समाजाच्या इतर मागण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांकडून समाजाला एकत्र करत बहुजन हक्क संवर्धन मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात दलित, ओबीसी, आदिवासी, भटके - विमुक्त, अल्पसंख्यांक समाज लाखोंच्या संखेने सहभागी होणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई गिरकर, आमदार हरिभाऊ राठोड इत्यादी पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना या मोर्चाची तयारी गेले 4 महीने सुरु आहे. मोर्चासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असुन या मोर्चामध्ये उच्च विद्याविभूषित लोकांबरोबर सर्व समाजातील लोक लाखोंच्या संखेने सहभागी होतील असे आनंदराज म्हणाले.

या मोर्चामध्ये एट्रोसिटी कायदा रद्द किंवा दुरुस्त न करता या कायद्याची कड़क अमल बजावणी करावी, मराठा समाजाला सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, भटक्या विमुक्तांना वेगले मंत्रालय व बजेट द्यावे, भटक्या विमुक्त जाती जमातीला एट्रोसिटी कायद्या अंतर्गत संरक्षण द्यावे, भटक्या विमुक्त जातीना क्रिमिलेअर मधून वगळावे, सच्चर कमीशन रिपोर्ट प्रमाणे मुस्लिमाना आरक्षण द्यावे इत्यादी मागण्यासाठी हा मोर्चा असल्याचे चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले.

मोर्चात सामील होणारे नेते, पक्ष आणि संघटनाकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई गिरकर, रिपाइंचे अविनाश महातेकर, नानासाहेब इंदिसे, अर्जुन डांगळे, आमदार हरिभाऊ राठोड, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे आणि उपमहापौर अविनाश लाड, माजी आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, अखिल भारतीय मातंग संघाच्या कुसुमताई गायकवाड, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, असे विविध समाजाचे, पक्षांचे आणि संघटनांचे प्रतिनिधित्त्व करणारे नेते या वेळी सामील होणार आहेत.

Post Bottom Ad