जास्त आंतरजातीय विवाह होणाऱ्या जिल्ह्याला प्रोत्साहनपर 25 ते 30 कोटीचे बक्षिस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जास्त आंतरजातीय विवाह होणाऱ्या जिल्ह्याला प्रोत्साहनपर 25 ते 30 कोटीचे बक्षिस

Share This
'मी' मराठीच्या वॉर रूम मधे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची महत्वपूर्ण घोषणा - 
जातीय विषमता दूर करायची असेल तर आंतरजातीय विवाह ही काळाची गरज आहे त्याकारिता ज्या ज्या जिल्ह्यात जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह होतील त्या जिल्ह्याला 25 ते 30 कोटी रूपये बक्षिस शासनाकडून देण्यात येईल अशी योजना लवकरच आणन्याचा आमचा विचार आहे आणि या बाबत मी राज्य सरकारशी लवकरच चर्चा करणार असल्याचे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सांगितले 'मी' मराठीच्या वॉर रूम मधे त्यांनी वरील आंतर जातीय विवाहा बाबत ही महत्वपूर्ण योजनेची माहिती दिली.

तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत या नविन योजने मधे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोड़प्या मधील पती पत्नी पैकी कुणा एकाचा शासकीय नोकरी मधे समावेश करने, तसेच 5 लाख रूपये रोख स्वरुपात देने, किव्हा 5 एक्कर जमीन देण्याचा आमचा विचार आहे. यामुळे विविध जाती मधे आंतरजातीय विवाह होण्याकरिता मदत होईल अश्या स्वरूपाची योजना लवकरच आणनार असल्याचे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages