आरबीआयच्या मूल्यांकनानंतरच रोखीने पैसे काढण्यावरील बंदी हटवण्यात येईल - अर्थमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

आरबीआयच्या मूल्यांकनानंतरच रोखीने पैसे काढण्यावरील बंदी हटवण्यात येईल - अर्थमंत्री

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेची बाजार परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतरच रोखीने पैसे काढण्यावरील बंदी हटवण्यात येईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी म्हटलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनिवासी भारतीय आणि परदेशात परतत असलेल्या नागरिकांना सोडून इतरांना चलनाबाहेरील नोटा जमा करण्यावर असलेली बंदी कायम करत केंद्रीय बँकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासही मनाई केली आहे.
नगदी पैसा काढण्यावरील बंदी केव्हा हटणार, अशी विचारणा केली असता, रिझर्व्ह बँक बाजारातील परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेईल. अनेकदा कार्यवाही अनेक टप्प्यात केली जाते, यासाठी ही सवलतही टप्प्याटप्प्याने वाढवून दिली जात आहे. तथापि एका खातेधारकाला बँक शाखेतून एका आठवड्यात २४,000 रुपयापर्यंत काढणे तथा एटीएमने ४,५00 रुपये प्रतिदिन काढण्याची परवानगी असणार आहे. बंदी घालण्यात आलेल्या जुन्या १000 आणि ५00 रुपयांच्या नोटा मिळण्यासाठीची सवलत ३0 डिसेंबर रोजी संपलेली आहे. काही वास्तविक कारणामुळे जर लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत यांच्यासाठी काय प्रयोजन आहे, असे विचारले असता, सुविधा ही सर्वासाठी लागू होती आणि रिझर्व्ह बँकेकडून निश्‍चित करण्यात आलेल्या मानदंडामध्ये आपण हस्तक्षेप करणार नसल्याचे अर्थमंत्र्यानी म्हटलेले आहे. त्यांनी सवलत कालावधीत पैसा जमा करणे किंवा त्यांना बदलवण्यात निष्फळ ठरलेल्या लोकांना दिलासा देण्याऐवजी लोकांनी मोठय़ा प्रमाणांवर नोटा बदलल्या आहेत. काही शिल्लक आहे मग काही कारण असो आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही. कारण रिझर्व्ह बँकेने मानदंड निश्‍चित केलेले आहेत आणि कमीत कमी आपण तरी या मानदंडाचा सन्मान करतो, असे जेटलींनी म्हटलेले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लोकांकडे ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या निवडक शाखांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याची संधी असेल असे म्हटलेले आहे, याबाबत विचारणा केली असता, पंतप्रधानानी या वेळी बोलताना याबाबतचे सर्व नियम आणि अटी रिझर्व्ह बँक निश्‍चित करणार असल्याचे जेटलींनी म्हटलेले आहे. पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला बोलताना म्हटलेले आहे, काही कारणामुळे ३0 डिसेंबर २0१५ पर्यंत जुन्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा जमा करू शकले नाहीत, ते रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या कार्यालयामध्ये जाऊन ३१ मार्च २0१७ पर्यंत घोषणा फार्म भरून जमा करू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या नियम आणि अटीनुसार अनिवासी भारतीय तथा परदेशातून परतलेल्या लोकांना भारतीय विमानतळावर आपल्या जुन्या ५00 आणि १,000 रुपयांच्या नोटा दाखवून त्यांच्याकडून स्टॅप लावून घोषणा फार्म घेऊ शकतात. यानंतर रिझर्व्ह बँकेत ही रक्कम जमा करू शकतील. जे भारतीय ९ नोव्हेंबरपासून ३0 डिसेंबरपर्यंत परदेशात होते, त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. तर अनिवासी भारतीयांसाठी ही सवलत ३0 जूनपर्यंत आहे.

Post Bottom Ad