राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगाराविषयीचे 274 अभ्यासक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगाराविषयीचे 274 अभ्यासक्रम

Share This
मुंबई दि 10: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत शैक्षणिक सत्र 2017-18 साठी रोजगार व स्वयंरोजगाराविषयीचे विविध 28 गटांतील अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. यात 6 महिने, 1 वर्ष आणि 2 वर्ष कालावधीचे अंशकालीन (Part time) आणि पूर्ण वेळ (Full time) स्वरुपाचे असे 274 अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. मंडळामार्फत यंदा 13 नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत.

मंडळाचे अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त असल्याने त्यांना विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सद्य:स्थितीत 1186 मान्यता प्राप्त संस्थांकडून मंडळाचे विविध प्रकारचे व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येत असून 85 हजार 220 इतके प्रवेशित विद्यार्थी आहेत.

सन 2017-18 साठी मंडळामार्फत सीसी इन सॉफ्टवेअर टेस्टिंग,डीसी इन डायलिसीस टेक्निशिअन, सीसी इन म्यूझिक अँड साऊंड टेक्नॉलॉजी, सीसी इन इमबेडेड सिस्टीमस अँड पीएलसी, सीसी इन ऑटोमेशन अँड पीएलसी, सीसी इन लिफट अँड एक्सीलेटर मेकॅनिक,सीसी इन सीएनसी प्रोग्रॅमर कम ऑपरेटर, सीसी इन ॲडव्हान्स ॲटोमेटिव्ह डायग्नोस्टिक सिस्टीम, सीसी इन लॅबोरेटरी मॅनेजर, सीसी इन लेबोरेटरी असिस्टंट, सीसी इन लेबोरेटरी इनचार्ज, सीसी इन लेबोरेटरी टेक्निशीअन, सीसी इन होम मॅनेजमेंट असे 13 नवीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत.

मंडळामार्फत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छुक संस्थांकडून/व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात आले असून, त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. 16 जानेवारी 2017 पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 31 जानेवारी 2017 पर्यंत विलंब शुल्कासह आहे. हे अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाचे संकेतस्थळ  www.msbve.gov.in येथे उपलब्ध आहे.

अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे, चलन, इत्यादी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडे वरील कालावधीत जमा करणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी अथवा मंडळाचे संकेतस्थळ www.msbve.gov.in यावर संपर्क करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण व परीक्षा मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages