नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील पोलीस दलात आजघडीला एकूण पाच लाख जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण २२ लाख ६३ हजार २२२ मंजूर पदांपैकी सद्य:स्थितीत १७ लाख ६१ हजार २00 जागा भरलेल्या असून, ५ लाख २ हजार २२ जागा रिक्त आहेत, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
आकडेवारीनुसार पोलीस दलाच्या सर्वाधिक रिक्त जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. यूपीतील एकूण ३,६४,२00 मंजूर जागांपैकी १.८0 लाख जागा रिक्तआहेत. पश्चिम बंगालमध्ये रिक्त जागांची संख्या ३५ हजार इतकी आहे. या ठिकाणी पोलीस दलाच्या एकूण १,११,१७६ जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. बिहारमध्ये १,१२,५५४ जागांपैकी जवळपास ३0,३00 जागा नवीन भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटकमध्ये १,0७,0५३ जागांपैकी २५,५00 जागा रिकाम्या आहेत. गुजरातमध्ये पोलीस दलाच्या ९९,४२३ जागांपैकी १७,२00 जागा रिक्त आहेत. तामिळनाडूमध्ये १,३५,८३0 मंजूर पदांपैकी जवळपास १६,७00 जागा रिक्तआहेत. तर झारखंडमध्ये एकूण ७३,७१३ जागांपैकी १५,४00 जागा आणि छत्तीसगडमध्ये एकूण ६८,0९९ जागांपैकी ८५00 जागा रिक्त आहेत.

पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोनुसार देशातील १८८ पोलीस स्थानकांमध्ये वाहनच उपलब्ध नाही. तर ४0२ पोलीस ठाण्यांमध्ये दूरध्वनीची जोडणीच करण्यात आलेली नाही. याशिवाय १३४ ठाण्यांमध्ये बिनतारी संदेश यंत्रणा उपलब्ध नाही. इतकेच नाही, तर ६५ पोलीस ठाण्यांत दूरध्वनी आणि बिनतारी यंत्रणा या दोन्ही सुविधा सुरू नसल्याचे ब्युरोने म्हटले आहे. देशात आजघडीला एकूण १५,५५५ पोलीस ठाणी असून, त्यापैकी १0,0१४ हे ग्रामीण भागात आहेत. तर उर्वरित पोलीस ठाण्यांकडे शहरी सुरक्षेची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे प्रत्येक १00 पोलीस कर्मचार्यांच्या पाठीमागे वाहनांची संख्या १0.१३ इतकी आहे. पोलीस दलासाठी एकूण १,७५,३५८ गाड्या देण्यात आल्या आहेत.