सॅमसंगची सर्व्हिस व्हॅन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2017

सॅमसंगची सर्व्हिस व्हॅन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार

मुंबई – सॅमसंग इंडियाने महाराष्ट्रासाठी सर्व्हिस व्हॅनची पहिली बॅच दाखल केली. सॅमसंगच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा घरपोच देण्यासाठी सर्व्हिस व्हॅन सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये, प्रमुख डीलर व वितरकांच्या उपस्थितीत, सॅमसंग इंडिया येथे ग्राहकसमाधान विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रशार यांच्या हस्ते 10 सर्व्हिस व्हॅनना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या व्हॅन महाराष्ट्रातील 248 तालुक्यांपर्यंत पोहोचणार हेत. प्रत्येक व्हॅनमध्ये डीजी सेट आणि प्रमुख सुविधाबसवल्या आहेत, जेमे करून सेवा देणाऱ्यांना झटपट सेवा देता येईल आणि तक्रारींचे निवारण तातडीनेकरता येईल. भारतभरातील ग्राहकांसाठी हा खास ग्राहकसेवा उपक्रम या वर्षीच्या सुरुवातीला दाखल करण्यात आला आणित्यामध्ये एकूण 535 सर्व्हिस व्हॅन 6,000 तालुक्यांपर्यंत पोहोचणार आहेत.

यानिमित्त बोलताना, प्रशार यांनी सांगितले, “ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहकसेवा देण्याचा सॅमसंगचा नेहमीचप्रयत्न असतो. या नव्या उपक्रमामुळे, ग्रामीण भागातील आमच्या ग्राहकांना शहरी ग्राहकांप्रमाणेच झटपट वदर्जेदार सेवा मिळणार आहे. राज्यातील सर्व ग्राहकांना, प्रामुख्याने ग्रामीण भागांना, अत्यंत दर्जेदार सेवापुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

या व्हॅनमुळे ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा अवलंब झपाट्याने करण्यासाठी मदत होईलच, शिवाय सर्वाधिकगरज असलेल्या परिसरांमध्ये कौशल्ये व रोजगार पुरवला जाईल. या सर्व्हिस व्हॅनना पूरक ठरण्यासाठी, देशभर अंदाजे 250 सर्व्हिस पॉइंट्स व 250 निवासी अभियंते सज्ज ठेवण्यात आले आहेत. निवासी अभियंते दूरवरच्या ठिकाणी असतील आणि त्यांच्या परिसरातील सॅमसंग ग्राहकांपर्यंतपोहोचण्यासाठी मदत करतील. नव्या उपक्रमामुळे सॅमसंगच्या एकूण टच पॉइंट्सची संख्या 2,000 वरून3,000 पर्यंत वाढली आहे आणि या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठे सेवेचे जाळे म्हणून उत्तम सेवादेण्यासाठी सॅमसंगला मदत करत आहे. या व्हॅनमुळे सॅमसंगला जागतिक दर्जाची सेवा ‘केव्हाही, कोठेही’ पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे. ग्राहकांना 1800-40-SAMSUNG (1800-40-7267864) असे डायल करून सर्व्हिस व्हॅनचा लाभ घेता येईल.

सॅमसंग इंडियाने दूरवरच्या ग्राहकांपर्यंतही सेवा पोहोचवण्याचा हा उपक्रम दर्शवण्यासाठी अलीकडेचदेशव्यापी टीव्ही व डिजिटल अभियान (https://www.youtube.com/watch?v=779KwjAYTeQ) सुरूकेले. अभियानातील चित्रपट #सॅमसंगसर्व्हिस व्हायरल झाला आहे आणि त्याने यूट्यूबवर अंदाजे 19 दशलक्ष व्ह्यू मिळवले आहेत.

Post Bottom Ad