होंडा- नॅव्हीचे हे नवे, क्रांतीकारी उत्पादन तरुण, भारतीय ग्राहकांचे लक्ष आकर्षित करण्यात यशस्वीझाले असून लाँच झाल्यापासूनच त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या वर्षातली बहुचर्चित दुचाकीअसलेली होंडा नॅव्हीला तरुण ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद सातत्याने वाढतच असून ऑक्टोबरमहिन्यात (बाजारपेठेत उपलब्ध झाल्यापासून सहा महिन्यांत) याच्या ५० हजार युनिट्स विक्रीचाटप्पा कंपनीने गाठला आहे.
होंडा नॅव्हीने फक्त चार महिन्यांत दोन हजार युनिट्स निर्यात करण्याचा आणखी एक महत्त्वाचाटप्पाही गाठला आहे. सध्या ही गाडी नेपाळ व श्रीलंका येथे निर्यात केली जात असून तिथे मिळतअसलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. विस्तार योजना अशीच पुढे सुरू ठेवत कंपनी नव्या निर्यातबाजारपेठांमध्ये प्रवेश करणार आहे.
अनोख्या लूकबरोबरच कस्टमायझेशनचा पर्याय ग्राहकांचा उदंड प्रतिसादमिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. नॅव्हीच्या अनोख्याकस्टमायझेशन पर्यायामुळे ग्राहकांना भरपूर उपलब्ध पर्यायांमधून त्यांच्यानॅव्हीला हवे तसे रूप देता येते. महत्त्वाकांक्षी, मीडिया सॅव्ही पिढीसाठीबनवण्यात आलेल्या नॅव्हीची एका खास अँड्रॉइड मोबाइल अप्लिकेशनद्वारेनोंदणी करता येते.
याप्रसंगी यविंदर सिंग गुलेरिया, वरिष्ठ उपाध्ययक्ष, विक्री आणि मार्केटिंग,एचएमएसआय म्हणाले, ‘नॅव्हीला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलोआहोत. या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाच्या मदतीने आम्ही तरुणांचे लक्ष आकर्षित करण्यात यशस्वी ठरलो आहोत. नवी, चमकदार क्रोम आणि साहसी आवृत्ती बायकिंगमध्ये मजा घेऊ इच्छिणाऱ्यांना नक्कीच एक खास पर्याय मिळवून देईल. यापुढेही आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अशा प्रकारचे कस्टमायझेशनचे विविध पर्याय पुरवत राहू.’
शंभर सीसी प्रकारातला तोचतोचपणा मोडीत काढत, त्यात थोडी रंगत आणणारी नॅव्ही ही पूर्णपणे भारतीय होंडा संशोधन व विकास विभागाने विकसित केली असून संकल्पनेपासून व्यावसायिक निर्मितीपर्यंत सर्व त्यांचेच योगदान आहे. होंडाचा धमाकेदार डीएनए पुढे नेणारी नॅव्ही अमर्याद शक्यतांचे अवकाश खुले करणारी आहे.
होंडा नॅव्हीला १०९ सीसी इंजिन बसवण्यात आले असून ते ७००० आरपीएमवर ८पीएस तयार करते व ट्युबलेस टायर्सवर ५५०० आरपीएमवर ८.९६ एनएमच्यासर्वोच्च टॉर्कची निर्मिती करते. गाडी पुढच्या बाजूला अपसाइड- डाउनसाइडटेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअर बाजूस हायड्र्युलिक मोनोशॉक तयार करते.