हैदराबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींपेक्षा मोठे नेते होते, असे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यांनी सांगितले. एका रॅलीला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर देशाला धर्मनिरपेक्ष तथा वर्गनिरपेक्ष संविधान दिले नसते तर देशातील अन्यायाचा स्तर आणखी वाढला असता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या लोकांनी देशातील परिस्थिती बिघडवण्यासाठी कोणतीच कसर शिल्लक ठेवली नसती असे ओवेसी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की स्वत:ला महात्मा गांधीचे अनुयायी मानणारे पंतप्रधान मोदी आता खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवर स्वत:चा चरखा चालतानाचा फोटो छापून 'महात्मा मोदी' बनले आहेत. तसेच मोदीजवळ कोणतीही परराष्ट्र निती नाही. पंतप्रधान होण्याच्या अगोदर ते पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची भाषा करत होते. सर्जिकल स्ट्राईकचे यश स्वत:कडे घेणारे मोदी त्यानंतर २८ जवान पाकिस्तानच्या गोळीबारात बळी पडले तरी शांत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले नाही.