मुंबई : अमर हिंद मंडळ, दादरच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १९ जानेवारी या कालावधीत मुंबई शहर जिल्हास्तरीय निमंत्रित कुमार व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर, अमरवाडी, गोखले रोड (उ), दादर (प.) मुंबई येथे केले आहे.
या कबड्डी स्पर्धेत १५ जानेवारी रोजी सायंकाळी कुमार गट स्पर्धेचे उदघाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व सेंट्रल रेल्वेची खेळाडू लता पांचाळ यांच्या हस्ते होईल. या स्पर्धेत कुमारांचे २४ संघ सहभागी होणार असून त्यात ना. म. जोशी मार्ग येथील शिवशक्ती क्रीडा मंडळ, विजय बजरंग व्यायामशाळा, प्रभादेवीच्या विकास क्रीडा मंडळ, यंग प्रभादेवी, ओम ज्ञानदीप मंडळ तर वरळीच्या गोल्फादेवी सेवा संघ यांच्या कामगिरीवर सर्व कबड्डीप्रेमींचे लक्ष असेल.
१६ जानेवारी रोजी सायंकाळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व सकाळ वृत्तपत्राचे क्रीडा संपादक माननीय शैलेश नागवेकर यांच्या हस्ते पार पडेल. या स्पर्धेत महिलांचे मातब्बर दहा संघ सहभागी होत आहेत. त्यामध्ये विशेषत: शिवशक्ती, शिरोडकर, महर्षी दयानंद, अंकुर, ओम ज्ञानदीप, मुंबई पोलीस, गोल्फादेवी आदी संघांची कामगिरी लक्षणीय ठरेल, असा होरा क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण १९ जानेवारी रोजी राणाप्रताप तिवारी यांच्या हस्ते पार पडणार असून या स्पर्धेतील दोन्ही गटांतील विजयी संघास प्रत्येकी रोख ८000 रुपये, उपविजयी संघास रोख ५000 रुपये तर उपांत्य उपविजयी संघांना रोख २000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूला रोख १000 रुपये तर स्पर्धेतील सवरेत्कृष्ट उत्कृष्ट पकड व चढाई करणार्या प्रत्येकास रोख ५00 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे.