बागेमध्ये मिकीमाऊस, डोरेमॉन, ऍनाकोंडाचे कार्टून्स -मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आज सकाळपासून पुढचे तीन दिवस लहानग्यांचे आवडते 'कार्टून कॅरेक्टर्स' अवतरणार आहेत ! यामध्ये विश्वविक्रमी मिकी माऊस सोबतच डोरेमॉन, डोनाल्ड डक, गुफी, स्नोव्हाईट यांच्यासह जंगलबुक मधला ऍनाकोंडा देखील येणार आहे ! यासाठी निमित्त ठरले आहे, ते महापालिकेचे वार्षिक उद्यान प्रदर्शन ! फुलांपासून तयार करण्यात येणा-या कार्टून कॅरेक्टर्स आधारित पुष्प रचना, हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. दि. १३ ते १५ जानेवारी २०१७ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित होणा-या या प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ मधील तरतूदींनुसार दरवर्षी वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणा-या फुले, फळे व भाज्या याविषयीच्या वार्षिक प्रदर्शनाचे हे २२ वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कुंड्यांमधील शोभिवंत झाडे, पुष्परचना, फुलझाडे, लॅण्डस्केप आर्ट आदी विविध विषयांवरील स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धांमध्ये शासकीय, निमशासकीय यासह खाजगी क्षेत्रातील संस्था / कंपन्या देखील सहभागी होऊन आपली पर्यावरणपूरक कला सादर करित असतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व रचना देखील या प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेत.
जिरे, मिरे, विलायची, लवंग, जायफळ, धणे यासारख्या मसाल्यात टाकावयाच्या पदार्थांची झाडे बघावयाची झाल्यास एरवी आपल्याला केरळ मध्येच जावे लागेल. मात्र महापालिकेने आयोजित केलेल्या प्रदर्शनामुळे यापैकी अनेक झाडे मुंबईतच बघण्याची संधी महापालिकेने आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे. तसेच विविध प्रकारची तुळशीची झाडे, बेल, हळद, कापूर, आवळा, बेहडा, हिरडा, चंदन बडीशेप, अश्वगंधा, बदाम, काजू यासह हात लावताच पाने मिटून घेणार लाजाळूचे झाड; यासारखी अनेक औषधी व सुगंधी झाडे देखील या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत.
यावर्षी प्रथमच या प्रदर्शनात परदेशी भाज्यांचे एक स्वतंत्र दालन आहे. त्यामध्ये झुकिनी, टुर्निप, नवलकोल, ब्रोकिली, रेड कॅबेज आणि बर्गर मध्ये वापरण्यात येणा-या लेट्यूस सारख्या भाज्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनात शोभेच्या झाडांसाठीही स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. यामध्ये मयूरपंखी, ब्रह्मकमळ, ख्रिसमस ट्री, निवडुंग, लिली, जरबेरा यासारखी अनेक शोभेची झाडे असणार आहेत. त्याचसोबतच झाडांमध्ये अत्यंत महागडे समजले जाणारे 'बोनसाय' अर्थात बटुवृक्ष देखील या प्रदर्शनात आपल्याला पहायला मिळणार आहेत.
विशेष म्हणजे या प्रदर्शनातील विक्री दालनामध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध असणार आहेत, अशीही माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. या प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवार दि. १३ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत, तर दि. १४ व १५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.