उत्तर प्रदेशात सपाच्या जबरदस्त आव्हानामुळे भाजपच्या पायाखालची वाळु सरकली - अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2017

उत्तर प्रदेशात सपाच्या जबरदस्त आव्हानामुळे भाजपच्या पायाखालची वाळु सरकली - अबु आझमी

मुंबई 9 जानेवारी - भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचे मुस्लिमांबद्दलचे ताजे वक्तव्य म्हणजे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपच्या प्रयत्नांचे पहिले पाऊल असल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे जबरदस्त आव्हान पाहून भाजपच्या पायाखालची वाळु सरकल्याचे हे लक्षण असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच सत्तेवर येण्यापुर्वी पंतप्रधानांनी दिलेली "सबका साथ सबका विकास' ही घोषणा कशी फसवी होती याचाच हा पुरावा असल्याचेही ते म्हणाले. 
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाली असून,प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या प्रचारादरम्यान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी उन्नाव येथील सभेत बोलताना मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. देशाची लोकसंख्या वाढण्यास हिंदु नाही, तर चार बायका आणि चाळीस मुले असलेले लोक या देशाची लोकसंख्या वाढवत असल्याचे निंदनीय वक्तव्य साक्षी महाराज यांनी केले होते. या वक्तव्याबद्दल भाजपचा निषेध करत मा. आझमी म्हणाले की, सत्तेवर येताना पंतप्रधान म्हणाले होते की, सबका साथ, सबका विकास..मात्र गेल्या पावणेतीन वर्षातील भाजपचा कारभार पाहता "सर्वांचा विकास'तर दूरच राहिला, सबका साथ मिळवण्यातही पंतप्रधान अपयशी ठरले आहेत.सत्तेवर आल्यापासून साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारखे भाजपचे नेते मुस्लिम समाजाला लक्ष्य करून एकापेक्षा एक चिथावणीखोर आणि घृणास्पद वक्तव्य करत आहेत. एक प्रकारे अशा वक्तव्यांची मर्यादाच भाजपच्या या नेत्यांनी अोलांडली आहे. तर दुसरीकडे लव्ह जिहादच्या खोट्या आरोपांखाली लोकांचा छळ केला जात आहे, दादरी येथे तर खोटेनाटे आरोप करत मोहम्मद इकलाखची हत्या झाली आणि बीफ खाण्यावर बंदी घालून मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचे घृणास्पद प्रयत्न केले जात आहेत. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे हे सर्व पाहूनही पंतप्रधान त्यावर कोणतेही भाष्य करायला तयार नाहीत, अशी भावनाही आझमी यांनी व्यक्त केली.

सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आपल्या कामांच्या बळावर निवडणुका जिंकणे शक्य नसल्याचे भाजपाला पक्के ठाऊक आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणातच ही बाब स्पष्ट झाल्यानेच आता धर्माच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण केले जात आहे. मात्र आता त्यांच्या या कुटील डावाला जनता बळी पडणार नाही, याबद्दल आम्हाला विश्वास आहे, असे सांगत मा. आझमी यांनी साक्षी महाराजांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी निवडणुक आयोगाकडे केली.

Post Bottom Ad