महापालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच

Share This
मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली. मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने महापालिका निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार आहे.  

जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे. नागपूरसह काही महापालिकांची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. मात्र मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेणार येणार असल्याची माहिती सहारिया यांनी दिली. सहारिया म्हणाले की, निवडणूक आयोगाने त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना त्यासंबंधी सूचना दिल्या असून पुढच्या काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. मुंबईसह नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, अकोला, अमरावती, सोलापूर या महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages