मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील कोकणी माणसाशी आपल्या स्नेहाची नाळ घट्ट करण्यासाठी आणि त्यांच्याशी आपल्या सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने आणि आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मुंबईत विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात कोकणवासीय स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुखमंत्री नारायण राणे, माजी खासदार गुरुदास कामत, आमदार वर्षाताई गायकवाड, भाई जगताप, कालिदास कोळंबकर, माजी आमदार कृपाशंकर सिंह, बाबा सिद्दीकी, श्याम सावंत, कृष्णा हेगडे, मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शीतल म्हात्रे आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले की, गेली ५० वर्षे मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेने राजकारण केले. कोकणी माणसाने भावनिक होऊन शिवसेनेला साथ दिली. पण आज मुंबईत कोकणी माणूस कुठे आहे. मुंबई कोकणात आहे. पण कोकणात मुंबई किती आहे? ज्या कोकणी माणसाच्या जीवावर जीवावर शिवसेना मोठी झाली. मातोश्रीच्या विकास झाला, तो कोकणी माणूस देशोधडीला लागलेला आहे. आज ज्या लालबागमध्ये, गिरगावमध्ये, दादर मध्ये, परळ मध्ये कोकणी माणसाने शिवसेना वाढवली तिथून तो हद्दपार होऊन कल्याण, डोंबिवली, दिवा, विरार येथे फेकला गेला आहे. ज्या तरुणांनी शिवसेनेसाठी आपले रक्त सांडले, स्वतःवर निरनिराळ्या प्रकारचे खटले ओढवून घेतले. त्याचे शिवसेनेला कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यांच्या बलिदानाची शिवसेनेने किंचितही जाणीव ठेवलेली नाही. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ज्या कोकणी माणसाची गावाला मोठं-मोठी माडीवजा घरे आहेत. त्याला मुंबईतील ८ बाय १० च्या घरात अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागते. फक्त निवडणुकीपुरता कोकणी मराठी माणसाचा वापर करणाऱ्या शिवसेनेला महानगरपालिकेतून हद्दपार करा. त्यांना कोकणी माणसाची ताकद दाखवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, गेली ५० वर्षे कोकणी माणसाने मुंबईवर प्रेम केले. कोकणी माणसाला शिवसेनेकडून आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही आणि त्यातील एकही आश्वासन शिवसेनेने पूर्ण केलेले. नाही. शिव वडापाव मिळाला, पण तोही हायकोर्टाने अवैध असल्याची हायकोर्टाने ऑर्डर दिली. ज्या शिवसेनेकडून मराठी माणसाने आजपर्यंत आशा बाळगली, ती अक्षरशः धुळीस मिळाली आहे. म्हणून महापालिकेतून शिवसेना-भाजपाला हद्दपार करण्याचा निर्धार मुंबई काँग्रेसने केलेला आहे. अशा वेळी नितेश राणे यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मुंबई काँग्रेसला साथ देण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. काँग्रेस कधीही जाती-धर्मांचे राजकारण करीत नाही. म्हणून ज्या शिवसेना –भाजपाने महापालिकेत बसून विकासाच्या नावावर मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली. त्यांना महापालिकेतून हद्दपार करून आम्हाला मुंबईचा विकास करण्याची एक संधी द्या, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.
या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील कोकणवासीयांच्या विकासाची उद्दिष्टये डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासाचा जाहीरनामा सादर करण्यात आला. या जाहीरनाम्यात मुंबईत सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक बाबींसाठी स्वतंत्र कोकण भवन उभारणे, महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये कोकणातील उत्पादनांसाठी जागा उपलब्ध करून देणे, मुंबईतील मॉल तसेच अपना बाजारसारख्या बाजारात कोकणातील उत्पादनांना कमी दारात जागा उपलब्ध करून देणे, कोकणातून मुंबईत येणाऱ्या व आलेल्या सर्व युवकांना संघटित करून त्यांच्या अडचणी सोडवणे, कोकणातून येणाऱ्या बेरोजगार युवकांसाठी नोकरी महोत्सव आयोजित करणे, महिलांसाठी बचत गट स्थापन करून त्यांना व्यवसाय व वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित करणे, कोकणातील युवकांतील सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक गुणांना प्रोत्साहित करून त्यांना योग्य ती मदत करणे, कोकणातील युवकांसाठी आरोग्यदायक मदत उपलब्ध करणे, कोकणातील कलाविष्कार (दशावतार) या संस्कृतीचे जातं करून त्यांना प्रोत्साहित करून नावलौकिक मिळवून देणे, कोकणातील भजन सम्राट मंडळांचे जंगी सामने आयोजित करून ही कला जोपासणे, कोकणातील खाद्यपदार्थ उदा. कोंबडीवडे, घावने, पोळ्या, इत्यादींसाठी दुकाने उपलब्ध करून देणे. ही त्या जाहीरनाम्यातील प्रमुख उद्दिष्टे आहेत.