पालिका आरोग्य केंद्रातील स्वयंसेविका पालिकेच्या कर्मचारिच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2017

पालिका आरोग्य केंद्रातील स्वयंसेविका पालिकेच्या कर्मचारिच

उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब -
मुंबई / प्रतिनिधी - 
मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिला आरोग्य स्वयंसेविका नसून कर्मचारी आहेत या औद्योगिक न्यायालायाच्या निर्णयावर उच्च न्यायलयाच्या शिक्कामोर्तब केले आहे अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.


1990 साली महापालिकेने 176 आरोग्य केंद्रांची स्थपना करून 4 हजार महिलांची स्वयंसेविका म्हणून नेमणुका केल्या होत्या. या महिला घरोघरी जाउन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने मदत करत असतात. या 4 हजार महिलांना पालिका कर्मचारी मानण्यास पालिकेने नकार दिल्याने औद्यागिक न्यायालयात संघटनेने दाद मागितली. यावर न्यायालयाने संबंधित स्वयंसेविका या कर्मचारी असल्याचा निर्णय दिला. या निर्णया विरोधात महापालिकेने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पालिकेची  याचिका उच्च न्यायालयाने फेटालून लावली असल्याची माहिती देवदास यांनी दिली.

उच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटालून लावल्याने या महिला कर्मचाऱ्यांना किमान वेतन नियमानुसार 5 हजार ऐवजी 12 हजार रुपये वेतन मिळणार आहे. भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, विमा, 5 टक्के घर भाड़े भत्ता, प्रसुती रजा, 2006 पासून मासिक 600 रुपये प्रवास भत्ता लागू होणार सुन त्याची थकबाकी म्हणून 80 हजार रुपये मिळणार आहेत असे देवदास यांनी सांगितले.

Post Bottom Ad