मुंबईतील सद्यस्थिती हे सत्ताधाऱ्यांचे अपयश - सुप्रिया सुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2017

मुंबईतील सद्यस्थिती हे सत्ताधाऱ्यांचे अपयश - सुप्रिया सुळे


सत्ताधाऱ्यांच्या "डीड यु नो'ला आमचे "यु शुड नो' हेच उत्तर -
मुंबई: १७ जानेवारी - मुंबईतील सध्याची स्थिती हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे अपयश असून मुंबईत विकासात्मक बदलाची गरज आहे. हा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते,असा असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलाआहे.कारण ज्या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, त्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईसारख्या महापालिकांमध्ये विकास झालेला दिसतो, असे सांगत शिवसेनेच्या "डीड यु नो?'या टॅगलाईनला आमचे "यु शुड नो'हे उत्तर असे असेही त्या म्हणाल्या. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.



मंगळवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महापालिकेसाठीच्या प्रचाराला मा.खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. आपल्या भाषणात त्यांनी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री म्हणतात त्यांना पारदर्शक कारभार हवा आहे. तर शहरात हजारो कोटींचा रस्ते घोटाळ्यामागे मुंबई महानगरपालिकेतील माफियाराज असल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष शिवसेनेवर करतात. पण राज्याची सत्ता गेली अडीच वर्षे तुमच्याकडे असताना या आरोपांची चौकशी का नाही केली, असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्रांना केला. तर शिवसेनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या कामाचा प्रचार करताना शिवसेना म्हणतेय "डीड यु नो', पण प्रत्यक्षात शहरात काय परिस्थिती आहेे हे सांगण्यासाठी आम्ही "यु शूड नो' ही मोहिम आखली आहे. कारण मार्केटींग आणि प्रत्यक्षात खूपच फरक आहे. आणि तो मतदारांसमोर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचाराची सर्व माध्यमे वापरणार आहे. पुढे त्या म्हणाल्या की, सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात हजारो कोटींच्या प्रकल्पांचे स्वप्न मुंबईकरांना दाखवले जात आहे, पण त्या प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी सरकारकडे पैसा कुठे आहे.आम्हीही नुसत्या प्रकल्पांच्या घोषणा करून, फलक लावले असते, पण आम्ही जनतेशी खोटं बोलत नाही. रस्ते घोटाळा, टॅब घोटाळा, कचरा घोटाळा हे आता खूप झाले असून आता मुंबईत परिवर्तनाची खरी गरज आहे. मुंबईत आजही पाण्याचा प्रश्न खुपच गंभीर असून कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. त्या प्रश्नांची सोडवणुक करण्याऐवजी सरकार मात्र बुलेट ट्रेनचे स्वप्न मुंबईकरांना दाखवते आहे.मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही तर लोकलच्या उत्तम सेवेची गरज असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जनतेचा विकास करण्यासाठी, शहर सुंदर करण्यासाठी,मुलांना योग्य शिक्षण आणि चांगली आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता हवी आहे, असे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, सुनिता शिंदे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, राष्ट्रवादी युवतीच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते तसेच सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तमाम महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


समविचारी पक्षांशी आघाडी करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका - सुप्रिया सुळे
आघाडीबाबतही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान भाष्य केले. ठाण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाली असून मुंबईतही आघाडी व्हावी,अशी आमची भुमिका आहे. गोव्यातही आघाडीसाठी मा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जात असून समविचारी पक्षांसोबत निवडणुक लढवण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा कल असल्याचे त्या म्हणाल्या.



ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्यासोबतच सत्ता उपभोगायची, हेच का पार्टी विथ डिफरन्स – सुप्रिया सुळे
आपल्या भाषणात सुप्रियाताईंनी भाजपचा खरपूस शब्दांत चांगलाच समाचार घेतला. भाजप हा त्यांच्या मित्रपक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, मात्र दुसरीकडे त्यांच्याबरोबर सत्तेत राहून परत पारदर्शकतेचीही भाषा करतो. राज्यात गुन्हेगारी शुन्य व्हावी, असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणतात. मात्र दुसरीकडे भाजपमध्ये गुंडांना वाजतगाजत प्रवेश दिला जातो. हेच भाजपाचे "पार्टी विथ डिफरन्स'आहे का,अशा शब्दांत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

Post Bottom Ad