पोलिसांच्या विविध मागण्यासांठी धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 January 2017

पोलिसांच्या विविध मागण्यासांठी धरणे आंदोलन

मुंबई / प्रतिनिधी / 19 Jan 2017 - 
पोलीस कुटुंबीयाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीमध्ये मुंबईमधील मोठ्या पोलीस वसाहतीमधील पोलिसांच्या पत्नींना सहभागी केले नसल्याने राज्यसरकार नाराज पोलीस पत्नी आणि माजी पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

पोलिसांवर हल्ले होत असतात, पोलिसांना घरे मिळत नाहीत इत्यादी समस्यांचे निवेदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री, गृहराज्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले. आझाद मैदानात आंदोलन ही करण्यात आले. यावर राज्य सरकारने बैठक घेऊन संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीमध्ये मुंबई उपनगरमधील पोलीस कुटुंबाचे सदस्य घेण्यात आले. मात्र मुंबई शहरातील वरळी पोलीस कॅम्प, बीडीडी चाळ, पोलीस लाईन, नायगाव पोलीस वसाहत, माहिम पोलीस वसाहत, ताडदेव पोलीस वसाहत, अश्या मोठ्या वसाहतीमधील एकाही सदस्याला स्थान देण्यात आलेले नाही. मुंबई शहरातील पोलीस वसाहतीमधील सदस्यांना समन्वय समितीमध्ये नेमणूक करावी म्हणून समन्वय समितीची संख्या वाढवावी तसेच पोलीसांच्या घरांचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad