मुंबई, दि. 19 Jan 2017 : राष्ट्रसेवेत अविरतपणे कार्य करण्याची तेजस्वी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ही परंपरा अधिकाधिक समृद्ध व्हावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी एअर व्हाइस मार्शल एम. फर्नांडीस, जनरल ऑफीसर कमांडिंग मेजर जनरल अनुज माथूर, फ्लॅग ऑफिसर महाराष्ट्र एरियाचे रिअर ॲडमिरल संजय माथूर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डी.एस. कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राव म्हणाले की, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र सेनेत भवितव्य घडविण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध आहे. याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. सैन्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी निधी गोळा करण्यात मुंबई शहराचा सिंहाचा वाटा आहे. ध्वज निधीच्या या उपक्रमात इतर सामाजिक संस्था, वित्तीय संस्था, शासकीय व खासगी संस्था, बँक, शाळा व महाविद्यालयांचा सहभाग असून, उपक्रमात इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी क्षेत्रिय, जिल्हा आणि तालूका स्तरावर जास्तीत जास्त निधी गोळा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील एकूण 52 अधिकाऱ्यांचा राज्यपाल यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यात विविध विभागातील उपायुक्त, वित्तीय संस्थांतील प्रतिनिधी, उपनिबंधक, तहसिलदार, जिल्हा नियोजन अधिकारी, टाटा ट्रस्ट, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, शिक्षणाधिकारी आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच प्रास्ताविक मुंबई शहर जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांनी तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डी.एस. कुशवाह यांनी आभार व्यक्त केले.